महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या पुण्यात आहेत. मनसेच्या शहर कार्यालयास ते भेट देणार असून यावेळी त्यांच्या हस्ते सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सध्याच्या एकूणच राजकीय परिस्थिती बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल झालेल्या मुंबईतील मेळाव्याच्या भाषणामधून महाविकासआघाडी आणि सध्याच्या राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले. याशिवाय आगामी काळात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे कामे केली पाहिजेत, याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले होते.

नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट देणार –

या भाषणातच त्यांनी आपण पुणे दौर्‍यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे हे उद्या पुण्यात येणार असून सकाळी १० वाजता नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मनसे सभासद नोंदणीच्या उपक्रमास सुरुवात होणार आहे. अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे. त्यामुळे या कार्यक्रमावेळी राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार हे आता पाहावे लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray will start membership registration of mns in pune tomorrow msr 87 svk
Show comments