पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाच्या महत्त्वाच्या विषयात मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती मनसेच्या मेळाव्यात गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी सरचिटणीस अनिल शिदोरे यांच्याकडे केली.
चिंचवड येथे मनसेच्या पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. गणेश सातपुते, शहराध्यक्ष मनोज साळुंके, गटनेते अनंत कोऱ्हाळे, संजय मरकड, मीना गटकळ, नगरसेवक राहुल जाधव, मंगेश खांडेकर, अश्विनी चिखले, सचिन चिखले, मयूर चिंचवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना कोऱ्हाळे यांनी या विषयाचे गांभीर्य नमूद केले. शहातील तब्बल ६५ हजार बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुले नागरिक हवालदिल झाले आहेत. महत्त्वपूर्ण विषय असल्याने ठाकरे यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी शिदोरे यांच्याकडे केली आहे. िपपरीतील कार्यकर्त्यांच्या भावना ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी बोलताना शिदोरे यांनी पदवीधर नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगितली. तळागाळापर्यंत जाऊन ताकदीने नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा