पिंपरी :  अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पोलीस अधिकारी असल्याचे व कुरीअरमध्ये अमली पदार्थ मिळाल्याचे खोटे सांगून  अटकेची भिती घालत फसवणूक करणार्‍या राजस्थानच्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहम्मद इलियास मोहम्मद सदिक कलाल (वय ३६, रा. लोसल, जि. सिकर, जयपूर, राजस्थान), मोहम्मद शाहिद अहमद अली (वय २५), पुरणसिंग रतन सिंग (वय २४), नाजील खत्री मन्वरअली खत्री (वय २९, तिघे रा. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड येथील एकाला आरोपींनी समाजमाध्यमातील व्हॉट्सअ‍ॅप टेलिग्रामद्वारे दृकश्राव्य संवाद पद्धतीने दूरध्वनी करुन फेडेक्स कुरीयरमधून बोलत असल्याचे सांगितले. मुंबई कस्टम विभागाला तुमच्या कुरीयरमध्ये शंभर ग्रॅम अमली पदार्थ मिळाले आहे. त्याला तुमचे नाव व आधार नंबर लिंक असल्याचे सांगितले. त्यासाठी मदतीच्या बहाण्याने अमली पदार्थ नियंत्रण विभागातून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीला अटकेची भीती घातली. पडताळणी प्रमाणपत्राच्या नावाखाली विश्वास संपादन केला. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख २२ हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली.

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
digital arrest thane latest news in marathi
Digital Arrest : डिजीटल अटकेची भीती दाखवून वृद्धांची फसवणूक करणारे अटकेत, आतापर्यंत ५९ जणांची फसवणूक केल्याचे तपासात उघड
ED files money laundering case against BRS leader KT Rama Rao
ED Files Money Laundering Case ईडी पुन्हा सक्रिय! ‘या’ नेत्याविरोधात मोठी कारवाई, आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल
Akhilesh Shukla police
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत

हेही वाचा >>>ऑक्सफर्ड विद्यापीठात आता मराठीचे धडे

आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांपैकी एक खाते हे नाशिक येथील रिक्षा चालविणार्‍याचे असल्याचे पोलिसांना समजले.  त्यानुसार, नाशिक येथे पथक पाठवून तपास केला असता एका काळ्या रंगाच्या मोटारीतून एक जण येवून त्या व्यक्तीच्या खात्याची माहिती घेत बँक पासबुक, धनादेश बुक घेवून जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सखोल तपास केला असता जोधपूर, राजस्थान येथील काही जण पिसोळी, उंड्री भागात राहत असल्याबाबत तसेच त्यांच्याकडे काळ्या रंगाची मोटार असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार, पथकाने पिसोळी येथील जगदंबा भवनजवळील एआरव्ही न्यु टाऊन सोसायटीतील एका सदनिकेत छापा टाकला. आरोपींकडून वेगवेगळ्या कंपनीचे १८ मोबाईल, ९० मोबाईल सिमकार्ड, एक लॅपटॉप, ६० बँक पासबुक किट, ६० एटीएम, डेबिट कार्ड, दोन पारपत्र, १५ आधार कार्ड, तीन पॅन कार्ड, तीन वाहन परवाना, १७०० रुपयांची रोकड व दोन मोटारी असा ७२ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

युएसडीटी मार्फत देशांतर्गत, परदेशात पैसे

आरोपी हे फसवणुकीच्या रकमेतून युएसडीटी मार्फत देशांतर्गत व परदेशात पैसे पाठवित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, अधिक तपास करणे, त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले बँक खाते, त्यामधील व्यवहार, इतर साथीदारांकडे मिळून आलेला मुद्देमाल तसेच त्यांचा अशा प्रकारे किती गुन्ह्यात सहभाग आहे, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Story img Loader