पुणे : देशात शिक्षणाचे बकालीकरण, निर्बुद्धीकरण झपाटय़ाने होत आहे. मात्र, त्याची खंत कुणाला वाटत नाही, हे जास्त गंभीर आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शुक्रवारी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधना प्रकाशनातर्फे राजन हर्षे यांच्या ‘पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत, साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> धक्कादायक: दुरुस्तीनंतरही टेमघर धरणातून पाणीगळती; एवढे कोटी गेले ‘पाण्यात’

कुबेर यांनी देशातील शिक्षणाच्या सद्य:स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची कीव यावी, अशी परिस्थिती आहे. पुढील आव्हाने काय आहेत, हे त्यांना सांगितले जात नाही. समाजात पूर्वी विद्वान माणसे होती आणि त्यांचा आदर केला जात होता. आज तसे राहिलेले नाही. आज कुणाला शिक्षक व्हावेसे वाटत नाही. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ २.५ टक्के खर्च शिक्षणावर होतो, तर विज्ञान तंत्रज्ञानावर एक टक्काही खर्च होत नाही, अशी खंत  त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विवेक सावंत, विनोद शिरसाठ आणि पुस्तकाचे लेखक राजन हर्षे यांनीही मनोगते व्यक्त केली.

शिक्षणावरील गुंतवणूक..

परदेशात विद्यापीठांची शैक्षणिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे शिक्षणाशी दुरान्वयानेही संबंध नसणारे शिक्षणमंत्री झाले. या परिस्थितीचे आपण तटस्थपणे मूल्यमापन करणार की नाही? शिक्षणावरील गुंतवणूक हा विषय राजकीय पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेवर असायला हवा, असे कुबेर यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajen harshe book pakshi unhacha sat vidyapithanchya aawarat released by girish kuber in pune zws
Show comments