राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो सेशनवर प्रतिक्रिया दिलीय. रुग्णालयातील एमआरआय (MRI) विभागात फोटो काढणाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय (MRI) काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही, असं मत व्यक्त केलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, “मी आरोग्यमंत्री आहे, मात्र आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय (MRI) काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही. लीलावती रुग्णलयात ज्या पद्धतीने फोटो काढण्यात आलेत ते रुग्णालयाच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. तसेच रुग्णालयाला अंधारात ठेऊन दुसरं कोणी फोटो सेशन केलं असेल तर तेही चुकीचं आहे.”

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी राणा दाम्पत्याच्या विरोधात…”, अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य

“टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत. काही कायदेशीर बाबी/नियम असतात त्याचं पालन झालं पाहिजे. कोणी आजारी असेल तर ते सार्वजनिकपणे इतरांना सांगण्याची गरज नाही. त्या व्यक्तीची तपासण व्हायला हवी, आजारी असल्यास त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. मात्र, त्यात राजकारण करण्याचं काम करू नये. ही चुकीची पद्धत आहे.”

Story img Loader