आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी असणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयाचे मुख्य प्रवर्तक आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. संजय देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत रुग्णालयात कर्करोगासाठीचे उपचार माफत दरात उपलब्ध होऊ शकणार आहेत.
राजीव गांधी जीवनदायी योजना दारिद्रय़ रेषेखालील (श्वेत शिधापत्रिकाधारक वगळता) नागरिकांसाठी असून राज्य शासन आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांच्यातर्फे ती राबवली जाते. रुग्णालयात ही योजना सुरू करण्यात आली असून त्यातून कर्करोगग्रस्तांना शस्त्रक्रिया व उपचार माफक दरात उपलब्ध होतील, असे डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा