आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या विविध नेत्यांच्या प्रवेशावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. राजू शेट्टी हे महायुतीतील घटक पक्षाचे नेते आहेत.
ते म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जहाज बुडणार हे नक्की आहे. या जहाजाला ज्यांनी कुरतडले तेच नेते आता शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. कोणतेही जहाज बुडायला लागल्यावर त्यावरचे उंदीर सर्वात आधी उड्या मारतात. अशा पद्धतीने हे नेते महायुतीच्या जहाजात येऊ लागले आहेत. मात्र, त्यांच्या येण्यामुळे महायुतीचे जहाज बुडायला नको. कोणाला किती महत्त्व द्यायचे हे शिवसेना आणि भाजपने ठरविले पाहिजे, असाही सल्ला राजू शेट्टी यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांची जागावाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी विविध नेत्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल भूमिका मांडली.
… त्यामुळे महायुतीचे जहाज बुडायला नको – राजू शेट्टी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या विविध नेत्यांच्या प्रवेशावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-08-2014 at 11:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty alerted leaders of shivsena bjp