राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार दिल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईत रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. भाजपने आपल्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आपल्या आमदारांना आज सुरक्षितस्थळी हलविणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर मंगळवारी सकाळी पुण्यातील तळजाई टेकडीवरील आल्हाददायक वातावरणात हास्यविनोद करण्यात रंगले होते.

या भेटीच्या वेळी राजकारणाची चर्चा होण्याची शक्यता कमी असली तरी राजकीय विरोधक असलेल्या आमदारांना एकत्र हास्यविनोद करताना पाहून टेकडीवर फिरायला येणाऱ्या पुणेकरांनी आश्चर्यमिश्रीत आनंद मात्र व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha election pune ncp and bjp mla morning walk together pune print news scsg
Show comments