महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी शनिवारी सकाळी सहापासून ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यानंतर दिवसभर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात विविध भागात पदयात्रांद्वारे मतदारांशी संपर्क साधला. वडगावशेरी मतदारसंघात नागरिक, संस्था आणि मंडळांकडून या पदयात्रांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
शिरोळे यांनी सकाळी सहा वाजता कमला नेहरू उद्यानात जाऊन ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे याही यावेळी उपस्थित होत्या. हास्य क्लब आणि पतंजली योग समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून शिरोळे यांनी नंतर वडगावशेरी भागातील पदयात्रेला येरवडा येथील पर्णकुटी चौकातून प्रारंभ केला. आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक सचिन भगत, योगेश मुळीक, भाजपचे शहर सरचिटणीस जगदीश मुळीक, महेंद्र गलांडे, शशिकांत कुलकर्णी, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले, आरपीआयचे परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, लतिका साठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
येरवडा, विश्रांतवाडी, शांतीनगर, टिंगरेनगर, धानोरी या भागात पदयात्रा झाल्यानंतर लोहगाव येथेही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. विविध मंडळांकडून पदयात्रेचे स्वागत केले जात होते.
वडगावशेरी मतदारसंघात शिरोळे यांचा पदयात्रांद्वारे संपर्क
महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी शनिवारी सकाळी सहापासून ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यानंतर दिवसभर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात विविध भागात पदयात्रांद्वारे मतदारांशी संपर्क साधला.
First published on: 30-03-2014 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally in wadgaon sheri of anil shirole