पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी पुणे विभागीय कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष किरण खाजेकर यांनी दिली.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षांवर गेल्यावर्षी बहिष्कार टाकला होता. १९९६ च्या संपातील वेतन मिळावे, निवृत्ती वेतन योजना लागू व्हावी अशा काही मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला होता. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने शिक्षकांनी पुन्हा परीक्षांच्या तोंडावर आंदोलनाची सुरूवात केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्य़ातील कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक सोमवारी दुपारी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा