पुणे : अयोध्या येथील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आपल्याला अद्याप आलेले नाही. अजून बराच अवकाश असल्याने निमंत्रण येईल. निमंत्रण आले तर राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला मी जाणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सांगितले. श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> खासदार होणार चारशे चार, मी करणार आहे वार!…रामदास आठवले असे का म्हणाले?

या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील काही नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही श्री राम मंदिर न्यासकडून निमंत्रण देण्यात आले आहे. पण, आपल्याला अद्याप निमंत्रण नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. राममंदिराच्या निमंत्रणासंदर्भात रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आठवले म्हणाले, मला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण आले तर मी जाणार आहे. मी बुद्धिस्ट आहे. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्मांचा आदर करण्याचे सांगितले आहे. अनेक गावांमध्ये मला मंदिरामध्ये बोलावतात. आम्ही देखील बुद्ध विहारांमध्ये इतर जाती धर्माच्या लोकांना बोलावतो. राममंदिर हा भाजपचा विषय नाही. राममंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर हा धर्मकारणाचा विषय आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale not yet get invitation of opening ceremony of ram mandir in ayodhya pune print news vvk 10 zws