कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप या दोघांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.
रामदास आठवले म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अनेक पक्ष लढविणार असल्याची माहिती मिळत आहे, पण माझे सर्व पक्षांना एक आव्हान आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास हीच खरी आदरांजली ठरेल. तसेच, जर निवडणूक झालीच तर आरपीआयचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे. आम्ही दोन्ही जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.