कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप या दोघांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक: “उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य”; शंकर जगताप यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा – ७ जणांच्या हत्याकांड प्रकरणी काळ्या जादुचा संबंध आहे का? पुणे पोलिसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, “प्रथमदर्शनी…”

रामदास आठवले म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अनेक पक्ष लढविणार असल्याची माहिती मिळत आहे, पण माझे सर्व पक्षांना एक आव्हान आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास हीच खरी आदरांजली ठरेल. तसेच, जर निवडणूक झालीच तर आरपीआयचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे. आम्ही दोन्ही जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale stance on kasba and chinchwad assembly by elections in pune svk 88 ssb
Show comments