पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील रामोशी आणि बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. भटक्या आणि विमुक्त जातीतील १० ऐवजी ५० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस म्हणाले, रामोशी आणि बेरड असा उल्लेख करून त्याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना सक्षम करण्याचे काम करण्यात येईल. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी रामोशी समाजाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रस्ताव तयार झाला असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramoshi is committed to the development of society testimony of devendra fadnavis amy
Show comments