पुणे : पुण्यातील गणेशोत्सवा मधील विसर्जन मिरवणुकीकडे पुणेकर नागरिकांचे दरवर्षी लक्ष लागून असते. या मिरवणुकीत शहरातील विविध संस्था आणि संघटना मिरवणुक पाहण्यास येणार्‍या नागरिकांना सेवा देण्याच काम करीत असतात. त्यापैकीच पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था २५ व्या वर्षाती पदार्पण करीत आहे. या संस्थेमार्फत आजवर मंडई चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यान येणार्‍या ११ चौकात सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून नागरिकाचे प्रबोधन करण्याच काम केले आहे. तर यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम राखत सायबर क्राईमवर आधारित भव्य अशा रांगोळया साकारल्या आहेत. तर या पुणेकर नागरिकांनी रांगोळ्या पाहण्यास एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे.

आणखी वाचा-पुणे : गेल्यावर्षी १०५.२ डेसिबल, यंदाच्या मिरवणुकीत दणदणाट किती?

यावेळी राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक मंदार रांजेकर म्हणाले की, यंदा २५ व्या वर्षांत राष्ट्रीय कला अकादमी संस्था पदार्पण करीत आहे. या संपूर्ण काळात प्रत्येक वर्षी सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून पुणेकर नागरिकाचे प्रबोधन करण्याच काम केले आहे. या उपक्रमाला पुणेकर नागरिकांनी नेहमीच प्रतिसाद दिला असून यंदा देखील कायम आहे. याबद्दल पुणेकर नागरिकांचे आम्ही आभारी आहोत, आपण सर्वजण सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याकाळात अनेकांच्या फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे लक्षात घेऊन यापुढील काळात आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊन म्हणून यंदा आम्ही सायबर क्राईमवर आधारित विसर्जन मिरवणुक मार्गावर येणाऱ्या ११ चौकामध्ये रांगोळी साकारल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी जवळपास दोन महिने रांगोळी साकारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये यंदा ३५० कलाकार सहभागी झाले असून १२५० किलो रांगोळी, ७५० विविध रंग, ७०० किलोचा गुलालचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader