लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णनारायण तिवारी (वय ३०), अंतिमा कृष्णा तिवारी (दोघे रा. शक्तीनगर, गौंडा, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहे. एका परिचितामार्फत ती आरोपींच्या संपर्कात आली होती. आरोपींना घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे. काळी जादू नष्ट करण्यासाठी विधी करावा लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर तिवारी महिलेच्या घरी गेला. आरोपींनी महिला आणि तिच्या लहान मुलीला सरबत प्यायला दिले. त्यानंतर तिला गुंगी आली. आरोपींनी महिलेची मोबाइलवर छायाचित्रे काढली.

आणखी वाचा-आधी कर्तव्य मतदानाचे…गर्भवती महिलेचे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान

त्यानंतर आरोपींनी महिलेशी पुन्हा संपर्क साधला. महिला आणि मुलीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करतो, अशी धमकी दिली. महिलेकडून आरोपींनी वेळोवेळी पैसे उकळले. तिच्याकडून दागिने घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ransom was extracted from woman fearing witchcraft case has been registered against fraudster in uttar pradesh pune print news rbk 25 mrj