सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ७७ वर्षे वयाच्या डॉक्टरवर एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेकडून पैशाची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याबाबतची तक्रारही या डॉक्टरने केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या परस्परविरोधी तक्रारींनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला डॉक्टरांची देखभाल करण्याचे काम करीत होती. या कालावधीमध्ये तिचा सर्व खर्च करण्याचे व घर घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. डॉक्टरांनी या महिलेसह इतर दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. संबंधित महिलेने व तिच्या साथीदारांनी आपल्याला धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी त्यांनी तीन लाख रुपये घेतले व आणखी २५ हजारांनी मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देऊ, असे सांगून जिवे मारण्याचीही धमकी दिली, असे डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader