पुणे : विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्य ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. आरोपीने उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने महिलेशी संपर्क साधून विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा – ‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक

हेही वाचा – शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड

जमीन खरेदीत गुंतवणूक करायची असल्याचे सांगून त्याने महिलेकडून ३८ लाख रुपये घेतले. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे तपास करत आहेत.

Story img Loader