लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: समाजमाध्यमातील ओळखीतून एका युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संभाजीनगरमधील युवकास अटक केली. फैजल दादामिया पठाण (वय १९, रा. बडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत एका युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फैजल आणि युवतीची समाजमाध्यमातून ओळख झाली होती.

फैजलने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फैजल पुण्यात आला. त्याने युवतीला हडपसर भागातील एका हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवतीवर त्याने संशय घेण्यास सुरुवात केली. युवतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्याने तिला त्रास दिला.

हेही वाचा… सांडपाण्यामुळे जांभूळवाडी तलावातील माशांचा मृत्यू

युवतीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने युवतीला स्वारगेट भागात भेटण्यास बोलावले. युवतीला मारहाण करून त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape of a young woman by social media friend in pune print news rbk 25 dvr