लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विवाहविषयक नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी गौरव पांडे उर्फ गौरव सारथी (वय २८, रा. मयूर विहार, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे : पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने महिलेवर ॲसिड फेकले

याबाबत तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी गौरव यांची विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झाली होती. गौरवने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून ६२ हजार ७५६ रुपये उकळले. तिला पुणे स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये भेटण्यास बोलाविले. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पोलीस उपनिरीक्षक तांगडे तपास करत आहेत.

Story img Loader