महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अल्पवयीन युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीने युवतीला धमकावून तिच्याकडून एक लाख ३८ हजार रुपये उकळले.

हेही वाचा >>>पुण्यातील भाषणात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, कुत्र्यांच्या नसबंदीवरून भाजपावर टीकास्र; म्हणाले, “यांची अक्कल कुठं…”

या प्रकरणी सुमीत बाळासाहेब जेधे (वय २६, रा. संगमवाडी, येरवडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अल्पवयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवतीची आरोपी जेधे याच्याशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. युवतीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष जेधने दाखविले होते. त्याने युवतीला जाळ्यात ओढले. डेक्कन भागातील एका हाॅटेलमध्ये त्याने युवतीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन बलात्कार केला. जेधेने युवतीचे मोबाइलवर छायाचित्र काढले. छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसार करण्याची धमकी देऊन त्याने युवतीकडून एक लाख ३८ हजार रुपये घेतले. त्यानंतर जेधे युवतीला धमकावत होता. घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.

Story img Loader