पुणे : Female Police Constable Rape in Pune शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पोलीस शिपायाला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिला पोलीस शिपायाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख होती. टाळेबंदीत मोघे हा महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला यायचा. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. तिच्यावर बलात्कार करुन ध्वनिचित्रफीत तयार केली.

हेही वाचा >>> पुणे: गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. महिला पोलीस शिपायावर वेळोवेळी अत्याचार केले. तिला धमकावून पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिला पिस्तुलाचा धाक दाखवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल संच, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरला. महिलेने नुकतीच खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape of female police constable by drugging her crime on police constable pune print news rbk 25 ysh