विवाहाचे आमिष दाखवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. सोमनाथ संभाजी कोद्रे (वय ३८, रा. मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे: नायडू रुग्णालयात गोवर आजारासाठी विलगीकरण कक्ष; ५० खाटांची सुविधा
पीडित युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करते. युवती सदाशिव पेठेत एका सदनिकेत भाडेतत्वावर राहायला आहे. काही दिवसांपूर्वी युवतीने एका ॲपच्या माध्यमातून नोकरीविषयक अर्ज केला होता. या ॲपच्या माध्यमातून पीडित युवतीची कोद्रेशी ओळख झाली. कोद्रे विवाहित आहे. त्याचे दाेन विवाह झाले आहेत. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाच्या आमिषाने त्याने युवतीवर बलात्कार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करत आहेत.