अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास समर्थ पोलिसांनी अटक केली.उमर पटेल (वय २२, रा. क्वार्टर गेट, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी उमरने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. उमरने मुलीला धमकावण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – पुणे : ऊसतोडणी कराराचे उल्लंघन ८१ कारखान्यांची ३९ कोटींची फसवणूक

त्यानंतर उमरने धमकावून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाली. उमरच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.

Story img Loader