लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (आंबेगाव पोलीस ठाणे) फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल; ‘या’ बहिणींचे पैसे बंद होणार?
Elderly man murdered
Crime News : लग्नाचे आश्वासन, सोन्याचे दागिने अन्… ७२ वर्षांच्या वृद्धाबरोबर रायगडमध्ये काय घडले? मुंबईतील जोडप्याला हत्येच्या आरोपाखाली अटक
pune municipal corporation loksatta news
पुणे महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस? नक्की काय आहे कारण…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर

पीडित तरुणी आणि आरोपीची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले होते. पोलीस भरतीच्या आमिषाने त्याने तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केल्याने त्याने त्यानंतर त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे तपास करत आहेत.

आणखी वाचा-पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका युवकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहायला आहे. त्याने मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची कोणाला वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण केली. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका देवकर तपास करत आहेत.

Story img Loader