लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका वकिलासह व्यावसायिकाच्या विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ॲड. विक्रम भाटे (वय ३४) आणि वैभव शिंदे (वय ३४) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

पीडीत तरुणी आणि ॲड. भाटे, शिंदे यांची ओळख होती. ॲड. भाटे आणि शिंदे तरुणीच्या घरी गेले होते. त्या वेळी त्याने तिला शीतपेयात मिसळून गुंगीचे औषध दिले. तरुणीला शीतपेय पिण्यासाठी आग्रह केला. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. धमकावून त्यांनी दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे तिने फिर्यादीत नमूद केले. आरोपींनी मारहाण करुन धमकावले. त्यांच्या धमक्यांमुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. बलात्कार, धमकावणे तसेच अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी ॲड. भाटेसह शिंदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

Story img Loader