पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात अश्लील भाषेत रॅप साँग बनवणं हे शुभम जाधव या रॅपरला चांगलंच महागात पडलं आहे. शुभमच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता शुभम जाधवने माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे शुभम जाधवने?

“मी रॅप साँग रेकॉर्ड करण्यासाठी परवानगी काढली होती. तरीही माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मी माफी मागतो माझ्या विरोधातली तक्रार मागे घ्या. माझ्याकडे कागदोपत्री संमती नव्हती. मात्र मी शूटिंग करायला गेलो तेव्हा संमती घेऊन गेलो होतो. विद्यापीठाकडून फोनवरून परवानगी मिळवली होती. माझ्या गाण्यात शिवीगाळ असेल याची कल्पना विद्यापीठाला दिली नव्हती. विद्यापीठाने आरोप केला आहे की संमती न घेता चित्रीकरण केलं. हे आरोप खोटे आहेत. मी हे आरोप फेटाळतो. माफी मागतो तक्रार मागे घ्या. ” अशी विनंती शुभमने केली आहे.

तर गाणं परत पोस्ट करेन

माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या पीआय यांच्याशी मी बोललो आहे. त्यांनी सांगितल्यानुसार मी गाणं युट्यूबवरून काढलं आहे. मी विद्यापीठाशी बोलून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद मिटत नसेल तर गाणं डिलिट करण्यात काहीच अर्थ नाही. माझं आर्थिक नुकसान होतं आहे. वाद मिटत नसेल तर मी गाणं परत पोस्ट करेन असंही शुभमने म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीने हे वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

शुभम जाधव हा रॅपर आहे. त्याच्या एका रॅप साँगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शुभम विरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेत रॅप साँगचं शूटिंग करण्यात आलं आहे. ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव या रॅपरने रॅप साँग म्हटलं आहे. या प्रकरणी शुभम विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapper shubham jadhav apology after controversy of his song in savitribai phule university scj
Show comments