पुणे : एका तरुणाला अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला उलट्या होणे, मळमळणे आणि भूक न लागणे अशी लक्षणे जाणवू लागली. गेल्या सहा महिन्यांपासून हा त्रास सुरू असल्याने त्याची प्रकृती खालावली. अखेर तपासणीत त्याला अचलसिया कार्डिया हा दुर्मीळ विकार असल्याचे समोर आले. डॉक्टरांना आधुनिक उपचार पद्धतीने शस्त्रक्रिया करून या तरुणाची त्रासापासून सुटका केली.

हा रुग्ण ३४ वर्षांचा असून, त्याला सहा महिन्यांपासून अन्न गिळण्याचा त्रास होत होता. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्याला बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीत त्याला डिसफॅगिया झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर एसोफॅगोगॅस्ट्रोड्युओडेनोस्कोपी (ओजीडी) ही करण्यात आली होती. त्यातून त्याला अचलसिया कार्डियाचा त्रास असल्याचे समोर आले. त्याची तपासणी केल्यानंतर डॉ. प्रसाद भाटे आणि त्यांच्या पथकाने पर ओरल एन्डोस्कोपिक मायोटोमी (पीओईएम) प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

water intake
पाणी कसे व किती प्यावे?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Wisdom tooth extraction recovery tips after operation expert advice
जर तुम्हालाही अक्कलदाढ असेल, तर हे वाचाच…, तज्ज्ञांनी सांगितले अक्कलदाढ काढल्यानंतर २४ ते २८ तास काय करावे…
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
Here what happens to the body when you finish meals in less than 10 minutes
तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा….
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?
Gut health expert claims taking 16 spoons of ghee daily keeps
“मी दिवसातून १६ चमचे तूप खातो”, आतड्याच्या आरोग्यतज्ज्ञांनी केला दावा; पण, हे खरंच योग्य आहे का? वाचा, पोषणतज्ज्ञांचे मत…

हेही वाचा >>> आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; कोणी दाखविली ही हिंमत !

पीओईएम प्रक्रियेची सुरुवात ही संपूर्णत: एन्डोस्कोपिक पद्धतीने केली जाते. यामध्ये अन्ननलिकेच्या स्नायूवर एक छेद देऊन उद्भवणारी समस्या काढून सर्वसाधारणपणे गिळण्याची प्रक्रिया तयार केली जाते. ही कमी जखम करणारी आणि वेगाने बरी होणारी प्रक्रिया आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन तासांत रुग्ण पाणी पिऊ लागला. काही दिवसांतच तो द्रवरुपातील अन्न आणि दहा दिवसांत मऊ भोजनही घेऊ लागला, अशी माहिती डॉ. प्रसाद भाटे यांनी दिली.

हेही वाचा >>> प्रतीक्षेतील स्वयंपुनर्विकासाच्या सोसायट्यांचा मार्ग मोकळा

अचलसिया कार्डिया म्हणजे काय?

अचलसिया कार्डिया हा दुर्मीळ असा लोअर एसोफेजियल स्फिंक्टर (एलईएस) आजार आहे. या आजारात अन्ननलिकेच्या रक्तवाहिन्या घट्ट झाल्यामुळे एलईएस प्रसरण पावत नाही. त्यामुळे सेवन केलेले अन्न आणि द्रवपदार्थ हे पोटात जात नाहीत. जगभरात दर एक लाख लोकसंख्येमागे ८ ते १२ जणांमध्ये अचल्सिया कार्डिया विकार आढळतो.

Story img Loader