पुणे : भारतीय जनता पक्षाने राज्यातील अनेक मित्र पक्ष फोडले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळातही हाच प्रकार झाला. ज्या पक्षांना सत्तेत बसविले त्यांना खाली खेचण्याची ताकद असल्याचे जाहीर करत आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी केली. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार असल्यावर शिक्कामोतर्ब झाले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आणि पक्षाचा २० वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे मंगळवारी झाला. त्यावेळी जानकर यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष एस. एल. अक्की सागर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यावेळी उपस्थित होते.

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांना शिक्षा होणार की निर्दोष सुटणार? ५ सप्टेंबरला सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

बारामतीतून लढण्यास इच्छुक

वीस वर्षाच्या कार्यकाळात रासपने चार आमदार, ९५ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. बेंगलोर, आसाम गुजरातमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. टप्पाटप्प्याने प्रगती चालू आहे. त्यामुळे कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील सर्व जागा स्वबळावर लढविण्यात येतील. मिर्झापूर (उत्तर प्रदेश), परभणी, माढा, बारामती यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी स्वत: उत्सुक असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करताना सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांना सोबत घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, परभणी जिल्ह्यात संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर रासपचा झेंडा नक्की फडकविला जाईल. परभणीत कोणासोबत युती करणार नाही.