पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवावी, या मागणीसाठी शिवसेनेने काळेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यासंदर्भात, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना भेटून पावसाळ्यात नागरिकांना बेघर करू नका, अशी मागणी खासदार गजानन बाबर यांनी केली.
प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू आहे. त्यास शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. वर्षांनुवर्षे नागरिक त्या ठिकाणी राहत असून त्यांना ऐन पावसाळ्यात बेघर करू नका, अशी मागणी बाबर तसेच सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, मोहन गुरव आदींनी डॉ. म्हसे यांच्याकडे केली. तत्पूर्वी, सकाळी दहापासून आंदोलकांनी काळेवाडी येथे निदर्शने केली. दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तेव्हा पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी बाबर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, डॉ. म्हसे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बाबर यांना प्राधिकरण कार्यालयात आणण्यात आले. तेव्हा झालेल्या चर्चेत शिवसेनेने संबंधित नागरिकांची बाजू मांडली. राज्यशासनाला तुमच्या भावना कळवू, असे आश्वासन म्हसे यांनी शिष्टमंडळाला दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा