पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला. भाजपाच्या नगरसेवकांनी अंदाजपत्रक विकण्याचा प्रकारही केला. महापालिकेतील इतिहासात असा प्रकार कधीच घडला नव्हता, असा आरोप महाविकास आघाडीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, रवींद्र धंगेकर यांनी येथे केला. कसब्यातील भाजपचे उमेदवार, स्थायी समितीचे चार वर्षं अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांच्याकडेच या आरोपाचा रोख असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ च्या पुणे कार्यालयाला भेट देत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या कारभाराची पोलखोल केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न कोणते आहेत, याची माहिती आहे. त्यादृष्टीने प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीबरोबरच वैयक्तिक जनसंपर्काचा कसबा पोटनिवडणुकीत निश्चित फायदा होणार आहे. भाजपाकडून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल, याचा विचार कधीच केला नव्हता. उमेदवार म्हणून नावाची घोषणा केल्यानंतर टिळक कुटुंबियांची भेट घेण्यामागे कोणतीही ‘राजकीय खेळी’ नव्हती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याबरोबर असलेल्या सलोख्याच्या संबंधातूनच ही भेट झाली होती. पोटनिवडणूक माझ्या नावाभोवती फिरत राहिली. त्यामुळेच काँग्रेसकडून माझ्या नावाची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शैलेश टिळक यांचे नाव नाकारले, ही वस्तुस्थिती आहे, असा दावा धंगेकर यांनी केला.
कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची टक्केवारी फार मोठी नाही. निवडणुकीत ब्राह्मणेतर मतदारच निर्णायक ठरणार आहेत. महापालिकेतील सत्ताकाळात भारतीय जनता पक्षाने केलेला गैरव्यवहार हाच निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरणार आहे. भाजपाने गैरव्यवहाराचा उच्चांक करताना साडेआठ हजार कोटींचे अंदाजपत्रकच विकण्याचा प्रकार केला, असे सांगत धंगेकर यांनी स्थायी समितीचे चार वर्षे अध्यक्ष राहिलेले आणि कसब्यातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर आरोप केला.
हेही वाचा – काळाचा घाला! पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना कारची धडक; पाच महिलांचा मृत्यू
कसबा भाजपाचा मतदारसंघ असतानाही भाजपा नेत्यांना आणि नगरसेवकांना कसब्याचा विकास करता आला नाही, हे कसब्यातील मतदार ओळखून आहे, असे धंगेकर यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असल्याने यावेळी मतविभागणी होणार नाही. त्याचा तोटा भाजपाला होईल. त्याउलट शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर माझे वैयक्तिक पातळीवर उत्तम संबंध असल्याने त्याचा फायदा मतपेटीतून दिसेल, असा दावाही त्यांनी केला. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी धंगेकर यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते.
हेही वाचा – वीजचोरीमुळे ३० गुंठे उस जळाल्याचे उघड
महिलांसाठी भुयारी स्वच्छतागृह?
कसबा विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या ५३ टक्के एवढी आहे. कसब्याचा आमदार ठरविण्यात महिला मतदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. मात्र, महिलांसाठी मतदारसंघात पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत, याकडे रवींद्र धंगेकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी कसबा मतदारसंघात जागेचा अडथळा आहे. शहराची वाटचाल मेट्रो सिटी म्हणून होत आहे. त्यामुळे मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्याच लागणार आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर भुयारी स्वच्छतागृहे उभारण्याचा विचार सातत्याने करत आहे. तुळशीबागेसह अन्य गर्दीच्या ठिकाणी या प्रकारच्या स्वच्छतागृहांच्या उभारणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तसेच मध्यवर्ती पेठांतील रस्ते रुंदीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही धंगेकर यांनी दिली.