मागील काही महिन्यांतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. मात्र, आज पुण्यातील ‘पीएमपीएमएल’च्या चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्याने त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी वर्गाला अधिक बसला आहे. त्याचदरम्यान कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे दोघेही पीएमपीएमएल बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी एकत्रित आल्याचे पाहण्यास मिळाले.
शहरातील विविध भागांत संध्याकाळपर्यंत बस सेवा सुरू झाली पाहिजे, अशी मागणी धंगेकर आणि मुळीक यांनी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना केली. पीएमपीएलएलसाठी काँग्रेस आणि भाजपाचे नेते एकाच मुद्द्यावर एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जगदीश मुळीक यांनी रवींद्र धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.
आज शहरातील पीएमपीएमएल सेवा ठप्प झाल्याने अचानकपणे धंगेकर आणि जगदीश मुळीक पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यालयामध्ये समोरासमोर आले. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्या गप्पा झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्या अचानक भेटीबाबत जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकीय जीवनात विजय, पराभव होत असतात आणि आपल्या राजकीय संस्कृतीनुसार मी धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आज सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी पुढे आल्याने त्यांचे हार्दिक अभिनंदन आहे. विकासाच्या मुद्यावर नेहमीच कोणाच्याही सोबत आम्ही आहे”, असे भाजपाचे जगदीश मुळीक म्हणाले.
“आम्ही आजवर सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी लढत आलो आहे. त्यानुसार पीएमपीएमएल बस सेवा बंद असल्याने आज आम्ही अधिकार्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. पण त्याचदरम्यान आमदार धंगेकरदेखील आले. विकासाच्या कामासाठी आणि नागरिकांच्या समस्या दूर होण्याच्या दृष्टीने कोणीही सोबत आले, तर आम्ही नक्कीच साथ देऊ, असे सांगत पीएमपीएमएल लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे, अशी आमची मागणी असून, राज्य सरकार पीएमपीएमएल या संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे”, असे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.
“कोणत्याही कामासाठी किंवा समस्येसाठी एकत्रित येऊन लढले पाहिजे. तसेच जगदीश मुळीक आणि माझा परिचय अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे आज आमची सहज भेट झाली आहे. मी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. आता लवकरच सभागृहात प्रवेश करणार असून, पीएमपीएमएलसह अन्य प्रश्नांविरोधात आवाज उठवणार”, असे धंगेकर म्हणाले.
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की, आजपर्यंत अनेक वेळा पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी संप पुकारल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. जे ठेकेदार संपावर गेले आहेत, त्यांच्यावर पीएमपीएमएल प्रशासनाने कडक कारवाई करावी.
आज संध्याकाळपर्यंत संप मिटेल : ओमप्रकाश बकोरिया
पुणेकर नागरिकांना दररोज १७५० बसेसमधून सेवा दिली जाते. पण सहापैकी चार ठेकेदारांना त्यांचे पैसे मिळाले नाही त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका नागरिक सहन करीत आहे. त्यावर संबधित ठेकेदारांसोबत चर्चा सुरू असून, आज संध्याकाळ पर्यंत प्रश्न मार्गी लागेल, अशी शक्यता ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केली.