पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर ११ हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल २८ वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजपा उमेदवाराचा पराभव केला.
कसबा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जनतेचे आभार मानले आहेत. “मायबाप जनतेचे मनःपुर्वक आभार! हा विजय तुमचा आहे, हा विजय आपला आहे!” अशी अशा आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकला शेअर केली आहे. या निवडणुकीत विजयी झाल्यावर रवींद्र धंगेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कसब्यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. तब्बल ३० वर्षांनी काँग्रेसने भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे.