कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी होत जायंट किलर ठरले असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पिंपरी : बंडखोरीचा फटका बसला, पराभव मान्य – नाना काटे

त्यावेळी शैलेश टिळक,कुणाल टिळक यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. मुक्ता टिळक यांच्या फोटोला फुले वाहून रविंद्र धंगेकर यांनी अभिवादन केले.त्यानंतर शैलेश टिळक यांनी रविंद्र धंगेकर यांना निवडून आल्याबद्दल शुभेछा दिल्या आणि रवी भाऊ सहकार्य असू द्या, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.