पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात याप्रकरणात आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

“पुण्यातील अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला सोडून दिलं. याप्रकरणात जी कलमं दाखल व्हायला हवी होती, ती दाखल करण्यात आली नाही. खरं तर याप्रकरणात काल या आरोपीच्या वडिलांनाच अटक व्हायला हवी होती. मात्र, या उलट पोलिसांनी रेडकार्पेट टाकून आरोपीला घरी पाठवलं. खरं तर यात काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला, असा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच याप्रकरणात खरे दोषी हे तपास अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणीही त्यांनी केली.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा – पुण्यातील पोर्श गाडी अपघात प्रकरणाची देवेंद्र फडणवीसांकडून दखल; कठोर कारवाईचे दिले आदेश

“पोलीस विकले गेले अन् त्यांनी…”

दरम्यान, याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपांबाबत विचारलं असता, “याप्रकरणात राजकीय दबाव नसून ही पूर्णपणे पोलिसांची जबाबदारी होती. मात्र, पोलीस विकले गेले आणि त्यांनी आरोपीला तसेच सोडून दिले, असे ते म्हणाले. तसेच यावेळी बोलताना या आरोपीविरोधात कडक कारवाई करावी आणि पुण्यातील पब संस्कृती बंद व्हावी”, अशी मागणीही त्यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने एका मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात ही घटना घडली. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत करण्यात यावी अशी मागणी केली. तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणीही करण्यात आली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली तसेच या आरोपीला जामीन मंजूर केला.

पुण्याचे पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?

यासंदर्भात बोलताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “कल्याणीनगर भागात काल घडलेली घटना अंत्यत दुर्देवी आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दारू पिऊन कार चालवित होता. ही बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणी आम्ही पब मालक, आरोपीचे वडील आणि विना नंबर प्लेट गाडी देणार्‍या शो रूमच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी हा कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला न्यायालयाने काही अटींच्या आधारे जामीन दिला आहे. पण हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का? याबाबतचा तपास आमची टीम शाळेत जाऊन करत आहे.”

हेही वाचा – दुर्घटनेनंतर पोलिसांना पबच्या नियमावलीची आठवण; पब, बार वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश

याशिवाय “आम्ही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी चर्चा होत आहे. पण आम्ही सर्व प्रकाराची कलम लावली आहेत. तरी देखील कोणी चर्चा करीत असेल तर समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत, तसेच या प्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.