पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे खोल रुतली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आमदार रवींद्र दंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. धांगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली.ससून रुग्णालयातून ललित पाटील अमली पदार्थ विक्री करत होता. या प्रकरणात शेवते नावाचा दलाल मध्यस्थ होता. शेवते याने ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि पोलीस अधिकाऱ्यांना पैसे दिले, असा आरोप धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पुणे: ललित पाटील प्रकरणात सखोल तपास करा; रवींद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे खोल रुतली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आमदार रवींद्र दंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-11-2023 at 15:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra dhangekar request to police commissioner to conduct thorough investigation in lalit patil case pune print news rbk 25 amy