कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे कसबा गणपती मंदिर बाहेर तीन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू होते. पोलीस अधिकार्‍यांनी संबधित व्यक्ती विरोधात कारवाईच आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र आमचा कायदेशीर मार्गाने लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा- Kasba Bypoll Election Result 2023: “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरांना दिलं”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण!

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरुद्ध महविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे कसबा गणपती मंदिरात जाऊन आरती केल्यानंतर बाहेर येऊन रविंद्र धंगेकर हे पत्नी समवेत ठिय्या आंदोलनास बसले. पण हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्याकडील पोस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलन ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये.त्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा- पुणे: नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२३ द्वारे ६७३ पदांची भरती प्रक्रिया; ४ जूनला ३७ जिल्हा केंद्रावर पूर्व परीक्षा

रविंद्र धंगेकर म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुक आयोगाच्या नियमानुसार मी काल पाच वाजेपर्यंत प्रचार केला आहे.मात्र या मतदारसंघात काल पासून भाजपकडून दहशतीच वातावरण निर्माण करण्यात आल आहे.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रात्री ८ वाजेपर्यंत मतदारसंघात प्रचार करीत होते.हे सर्व पोलीस आणि निवडणुक अधिकाऱ्यांना माहिती होते.ही सर्व यंत्रणा राजकीय दबावाखाली काही करीत नाही. ही बाब निषेधार्थ असून याचा धडा कसबा मतदार संघातील जनता भाजपाला शिकवेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात

तसेच ते पुढे म्हणाले की, पोलिसांना सोबत घेऊन पैशांचा सर्वत्र वाटप सुरू असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. माझ्या कार्यकर्त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना आज मी जवळपास तीन तासापासून ठिय्या आंदोलन केले आहे. संबधित व्यक्ती विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकार्‍यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेत आहे. याविरोधात जोवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा कायदेशीर मार्गाने लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader