पुणे : पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. या बैठकीला कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हजेरी लावली होती. पण या बैठकीवर रवींद्र धंगेकर यांनी बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्यावर चंद्रकांत पाटील नाराज आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला निमंत्रण नसलेली व्यक्ती बैठकीत आली होती. बैठकीमधील एकूणच परिस्थिती पाहता बैठकीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र आणण्याची फारच घाई…”, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

या बैठकीतील घडामोडींबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांना बैठकीला बोलविलं होतं आणि ते आलेदेखील होते. पुणे महापालिकेचे गणेश बिडकर हे सभागृह नेते देखील होते. २०१७ ते २२ काळा मधील प्रकल्पाच्या संदर्भात त्यावेळी त्यांनी भूमिका मांडली आणि गणेश बिडकर निघून गेला. त्यानंतर काही वेळात रवींद्र धंगेकर आपले काहीही मुद्दे न मांडता निघून गेले. त्यांनी आपला सहभाग देखील नोंदविला नाही. रवींद्र धंगेकर हे रागवून गेल्याचं आताचं समजलं असल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, त्यांना फोन आला असावा म्हणून ते बाहेर गेले अन्यथा मी धंगेकरांना एक फोन केला असता असे त्यांनी सांगितले. ‘रात गयी बात गयी’, निवडणुक झाली आहे. ते आता आमदार झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलावलं तर मी नक्की जाईन अशी भूमिका त्यांनी यावर मांडली.