पुणे प्रतिनिधी: केंद्र सरकाराच्या अखत्यारीत येणार्‍या पुरातत्व विभागाच्या जाचक नियमामुळे पुणे शहरातील शनिवारवाडा परिसरातील 300 मीटर भागातील मिळकतींना बांधकाम करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून केंद्र सरकारने परवानगी द्यावी. या मागणीसाठी शनिवारवाडा कृती समितीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकरनी जोशी श्रीराम मंदिरात आरती करून केंद्रातील भाजप सरकारला आमच्या भागातील मिळकतीचे प्रश्न सुटण्याची सुबुद्धी देवो हीच प्रार्थना यावेळी त्यांनी केली.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, शनिवारवाडा परिसरातील ३०० मीटर परिसरात हजारो वाडे आणि इमारती आहे. केंद्र सरकाराच्या अखत्यारीत येणार्‍या पुरातत्व विभागाने त्या सर्व मिळकतीना बांधकाम परवानगी द्यावी. या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४८ खासदारांकडे पत्रद्वारे मागणी केली आहे. तसेच आपल्या राज्यातील सर्व खासदार संसदेत प्रश्न मांडतील आणि मिळकतीचा प्रश्न मिटेल हीच अपेक्षा आहे. त्यासाठीच आज जोशी श्रीराम मंदिरात आरती करून केंद्रातील भाजप सरकारला आमच्या भागातील घरांचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी देवो हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा- १२ तासात मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन अपघात, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

तसेच ते पुढे म्हणाले की, आमचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. मात्र हा प्रश्न लवकरात लवकर सुटला नाही, तर आम्ही जनआंदोलन उभारू असा इशारा यावेळी देखील त्यांनी दिला.