पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रवींद्र, अशी नवी घोषणा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना करण्यात आली. या घोषणेची चर्चा कसब्यात रंगू लागली आहे.
या घोषणेला भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. देशात आणि राज्यात विकासाचे काम सुरू आहे, हे विरोधकांनी मान्य केले आहे. त्यामुळेच विरोधकांना भाजपा नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. भाजपाच्या विकासाची भूमिका विरोधकांनी मान्य केली आहे, असे उत्तर भाजपाकडून घोषणेला देण्यात आले आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक उतरणार असल्याने प्रचारातील रंगतही वाढणार आहे. यातच विरोधकांनी दिलेल्या नव्या घोषणेमुळे कसब्याची निवडणूक किती रंगतदार होणार, हे दाखवून दिले आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी नाराज शैलेश टिळक यांची भेट घेतली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या यात्रेत केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रवींद्र अशी घोषणाबाजी करण्यात आली. या दोन्ही घटना भाजपाच्या वर्मी लागल्या. त्यामुळेच भाजपाच्या निवडणूक तयारी बैठकीत त्यावर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना भाष्य करावे लागले.
देशात आणि राज्यात विकासाचे काम सुरू आहे, हे विरोधकांनी मान्य केले आहे. त्यामुळेच विरोधकांना भाजपा नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. भाजपाच्या विकासाची भूमिका विरोधकांनी मान्य केली आहे. त्यामुळे, भाजपा नेत्यांची नावे घेत घोषणाबाजी करण्यात आली, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.