लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: नवीन उजवा मुठा कालव्याच्या हडपसरच्या पुढे आणि फुरसुंगीच्या अलीकडील भागात पुन्हा गळती लागली आहे. हा प्रकार गुरुवारी लक्षात आल्यानंतर जलसंपदा विभागाकडून तातडीने कालव्याची गळती रोखण्यात आली.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
pink powder on los angeles
लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक?
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…

नुकतीच कालव्याची गळती रोखणे, मजबुतीकरण आणि कालव्यातील राडारोडा काढण्याची कामे करण्यात आली होती. तरीदेखील पुन्हा गळती लागल्याने या कामांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे.

आणखी वाचा-पुणे : मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला महापालिकेचा ‘खो’?

खडकवासला धरण ते इंदापूरपर्यंत नवीन मुठा उजवा कालवा वाहतो. या कालव्याची लांबी सुमारे १४० किलोमीटर आहे. हा कालवा शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहतो. सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वीचा हा कालवा असल्यामुळे पाणीगळती किंवा कालवा फुटणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंवर महिन्यात कालवा फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले होते. त्यानंतर आता कालव्याच्या ३२ किलोमीटरवर गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे. कालव्याची देखभाल करणारे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह कालवा निरीक्षक यांचे होत असलेले दुर्लक्ष यामुळेच या घटना वारंवार घडत आहेत.

आणखी वाचा- पिंपरी: प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने केले पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार

दर वर्षी कालव्याची पाहणी करून देखभाल-दुरुस्ती केली जाते. या कालव्याच्या शहरी भागात अजूनही काही प्रमाणात पाणीगळती आहे. ती रोखण्यासाठी अस्तरीकरण आणि मजबुतीकरणाची कामे सातत्याने करण्यात येतात. त्यासाठी ३७ कोटींचा निधी मंजूर आहे. या कालव्याची वहनक्षमता एक हजार क्युसेक आहे. कालव्यालगत प्रचंड अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या कालव्यात कचरा, राडारोडा सातत्याने टाकण्यात येतो. तसेच कालव्याचे भराव सैल झाले आहेत. त्याचप्रमाणे कालव्याखालून पाण्याची सुमारे ४० टक्के गळती होत असल्यामुळे शेवटपर्यंत म्हणजेच इंदापूरपर्यंत कमी पाणी पोहचते. या कालव्यातून कायमच शेतीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने या कालव्यात ओलावा असतो. त्यामुळे भरावाचे काम केले तरी खालच्या भागात ओलावा असल्याने दुरुस्तीनंतर हा भाग चांगला सुकत नाही, तोपर्यंत संबंधित भागातील गळती थांबत नसल्याचे जलसंपदा विभागाचे निरीक्षण आहे.

उजवा मुठा कालव्याच्या कि.मी. ३२ वर पाणीगळती झाली होती. ती रोखण्यात आली आहे. -विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Story img Loader