पुणे : मावळ तालुक्यातील कार्ले येथील श्री एकवीरा गडावर रज्जू मार्ग (रोपवे) प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम (डीपीआर) अंतिम टप्प्यात आले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकवीरा देवीच्या दर्शनासाठी केवळ तीन मिनिटांत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे एकवीरा मंदिर येथे रज्जू मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. श्री एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक ओळखले जाते. राज्यातील अशा तीर्थस्थळांचा विकास करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. हे काम सरकारकडून रस्ते महामंडळाला देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात त्यामध्ये नऊ तीर्थस्थळांचा समावेश असून त्यापैकी एक श्री एकवीरा देवी मंदिर आहे. या ठिकाणी रज्जू मार्ग प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… पुणे : म्हाडाच्या घरांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीला विलंब; नागरिक हैराण, नवीन संगणक प्रणालीचा परिणाम

हेही वाचा… पुणे: शाळांना सीबीएसई मान्यतेची बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

एकविरा देवी मंदिर उंच ठिकाणी असल्याने सध्या पायऱ्या चढून गडावर जावे लागते. पर्यटकांच्या सोयीसाठी याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी एक सुविधा निर्माण होणार आहे. तसेच अवघ्या तीन मिनिटात गडावर पोहचता येणार आहे. रज्जू मार्गाद्वारे दर तासाला सुमारे १४४० नागरिक गडावर पोहचणार असून या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३६ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. रज्जू मार्ग प्रकल्प सुमारे १२० मीटर उंचीवर असून लांबी सुमारे २९० मीटर इतकी आहे. रज्जू मार्ग प्रकल्प हा पूर्णत: पर्यावरणपूरक असणार आहे. या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती रस्ते महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.