पुणे : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेनंतर पुण्यात काही ठिकाणी जल्लोष करण्यात आला, तर काही ठिकाणी शांतता असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळपासून मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रातोरात मराठा आरक्षणाबाबतची राज्य सरकारची भूमिका राजपत्राद्वारे स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर वाघोली येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष साजरा केला. त्यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकाळीच ध्वनिवर्धक लावून कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एक मराठा लाख मराठा, छत्रपती श्री शिवाजी महाराजा की जय, श्री सभाजी महाराज की जय च्या घोषणा देण्यात आल्या. तर शहराच्या मध्यवर्ती भागात जल्लोषाचे वातावरण दिसून आले नाही.