पुणे :  दरवर्षी साहित्य संमेलनात होणाऱ्या पुस्तक विक्रीच्या उलाढालीची चर्चा होते. मात्र राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसादामुळे या महोत्सवात पुस्तकांच्या साडेआठ लाख प्रतींची विक्री झाली असून, सुमारे ११ कोटींची उलाढाल या महोत्सवात झाली. त्यामुळे पुस्तके आणि वाचनाशी संबंधित चार विश्वविक्रम नोंदवलेल्या या महोत्सवात पुस्तक विक्रीची उच्चांकी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यविषयक चर्चांना पुणेकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावतानाच मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदीही केल्याचे स्पष्ट झाले.  

हेही वाचा >>> यंदाचा साखर गाळप हंगाम पिछाडीवर का? जाणून घ्या, साखर उत्पादन का घटले..

पुणे पुस्तक महोत्सवाला सुमारे साडेचार लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली. पुस्तक विक्रीतून सुमारे ११ कोटींची आर्थिक उलाढाल झाली. त्यामुळे पुढील वर्षीही हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाला भेट देणाऱ्या, पुस्तक खरेदी करणाऱ्यांत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. महोत्सवात नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाच्या ८७ हजार प्रती, तर शिवराज्याभिषेक या पुस्तकाच्या ६९ हजार प्रती वितरित करण्यात आल्या. पुणे हे पुस्तकांची राजधानी होण्यासाठी महापालिकेबरोबर प्रयत्न केले जातील. तसेच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी एनबीटीचे पुण्यात केंद्र स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे म्हणाले.

हेही वाचा >>> खाद्यतेलाच्या आयातीला मुक्तद्वार, देशात सोयाबीन, सूर्यफुलाला हमीभावही मिळेना

पाटील म्हणाले, की नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे पुणे पुस्तक महोत्सव अविस्मरणीय झाला. या महोत्सवात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी करताना पाहिले. त्यामुळे मुले वाचत नाही असे म्हणणे मला अजिबात पटले नाही. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाची माहिती देणारे दालन असेल. पुणे पुस्तक महोत्सवाच्या प्रसार-प्रचारासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers enthusiasm in pune book festival 8 5 lakh book sold at pune book festival pune print news ccp14 zws