पिंपरी : वाढती लोकसंख्या, नागरिकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना कचरा डेपोसाठीच्या पुनावळेतील जागेचे १५ वर्षांपासून भिजत घोंगडे कायम आहे. पुनावळे परिसरात मोठे गृहप्रकल्प झाल्याने कचरा डेपोला विरोध होत आहे. परिणामी, कचरा डेपोचा प्रश्न जैसे थे आहे. मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येत असून, तिथे कचऱ्याचे ढीग झाले आहेत. भविष्यात शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात वास्तव्यास नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. चोहोबाजूने शहर झपाट्याने विस्तारत असून लोकसंख्या ३० लाखांच्या घरात गेली. त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. २०१७ मध्ये शहरात प्रतिदिन ८३२ टन कचरा निर्माण होत होता. सात वर्षांत यामध्ये ४०० टनाने वाढ झाली. आता १२५० टन दैनंदिन कचरा निर्माण होत आहे. घरोघरचा कचरा संकलित करुन मोशीतील कचरा डेपोत १९९१ पासून टाकला जातो. हा परिसर ८१ एकरचा आहे. या डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. मोशीत कचऱ्याच्या ढिगाचे डोंगर झाले आहेत. त्यामुळे पालिकेने २००८ मध्ये पुनावळेतील वन विभागाची २६ हेक्टर जागा घेण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात मुळशीतील पिंपरी येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार होती. मात्र, या ठिकाणी मुरूम असल्याने वन विभागाने या जागेचा पर्याय नाकारला.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील ‘वायसीएम’ रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण; मनुष्यबळाचीही कमतरता

पुनावळेतील जागेवर वृक्ष आहेत. कचरा डेपो झाल्यास झाडे तोडावी लागतील. त्यामुळे वन विभागाला झाडे लावण्यासाठी जागा देणे बंधनकारक आहे. महापालिकेने आतापर्यंत वनीकरणासाठी तीन कोटी ५७ लाख १३ हजार रुपये वेळोवेळी अदा केले आहेत. पुनावळेत मोठे गृहप्रकल्प झाल्याने बांधकाम व्यावसायिक, राजकारणी, स्थानिकांचा कचरा डेपोला विरोध होत आहे. त्यामुळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यात महापालिकेला यश आले नाही. लोकप्रतिनिधींनी सामजस्यांची भूमिका घेतली नाही, तर भविष्यात शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मुंबई-बंगळुरू महामार्गाचे किवळे ते वाकडदरम्यान रुंदीकरण

‘कचरा डेपोच्या जागेच्या बदल्यात वन विभागाला पर्यायी जागा द्यायची आहे. त्यानंतर जागा महापालिकेच्या ताब्यात येईल. जागा ताब्यात आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे’, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी म्हटले आहे. तर ‘मोशीतील कचरा डेपोची जागा अपुरी पडत आहे. शहरात नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुनावळेतील कचरा डेपोची जागा ताब्यात घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा डेपो सुरू करावा. जेणेकरून स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही’ असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले.