आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे यांच्यासह इतर पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बंडखोर पाहण्यास मिळाली. यामुळे वरिष्ठ नेत्यांना बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्या सर्व घडामोडी दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यावेळी अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. पण पुणे शहरातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही. यामुळे बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीतील उमेदवाराला अधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, भाजपकडून हेमंत रासने, मनसेकडून गणेश भोकरे आणि काँग्रेस पक्षाकडून कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहेत. कमल व्यवहारे पहिल्या महिला पुणे शहराच्या महापौर राहिल्या असून त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्ता बहिरट, तर काँग्रेस पक्षाचे नेते मनीष आनंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, मागील विधानसभा निवडणुकीत दत्ता बहिरट यांना काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामुळे फटका बसला होता. त्यावेळच्या निवडणुकीत काही हजार मतांनी दत्ता बहिरट यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा तर थेट पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करित निवडणूक लढवित आहे. यामुळे दत्ता बहिरट यांना मोठ्या प्रमाणावर ताकद लावावी लागणार असल्याचे दिसत आहे.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप

हेही वाचा – पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना

पर्वती विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या असून शरद पवार गटाकडून अश्विनी कदम, तर काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल आणि शरद पवार गटाचे नेते सचिन तावरे या दोन महाविकास आघाडीतील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मतविभाजनाचा फटका बसून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांचा विजय सहज मानला जात आहे. तर पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमधील नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण हे नेतेमंडळी अर्ज मागे घेतील अशी शक्यता होती. मात्र या नेत्यांनी अर्ज मागे घेतली नाही. यामुळे या बंडखोरीचा फायदा नेमका कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.