पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा… विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला जागा देण्याची मागणी, जागा न मिळाल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा

हे ही वाचा… “…तर आम्ही त्याला ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही”, मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा इशारा

महायुती मध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. अखेर आज विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील बापू भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासून सदस्य आहे. मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मी तयार झालो. माझं कुटुंब एकनिष्ठ काम करत राहिलं. परंतु, मला अजित पवारांनी मावळ मधून उमेदवारी दिली नाही. विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मला खूप दुःख झालं अशी खदखद बापू भेगडे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीला राम- राम ठोकला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार आहे निश्चित.

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतून बंडखोरी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही विद्यमान आमदार सुनील शेळके यांचं काम करणार नाहीत, असा ठराव आजच्या बैठकीत झाला आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. पक्षश्रेष्ठींचा फोन किंवा आदेश आल्यास आम्ही त्यांची माफी मागणार असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत. असं देखील बाळा भेगडे यांनी अधोरेखित केल आहे.