पुणे : पिस्तुलाच्या धाकाने भंगार माल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना बारामतीतीत लोखंडे वस्ती परिसरात नुकतीच घडली. ग्रामीण पोलिसंच्या पथकाने पसार झालेल्या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संतोष लक्ष्मण भंडलकर (वय ४२, रा. पणदरे, बारामती), सुरेश अशोक राखपसरे (वय ३३, रा कुंजीर वस्ती, मांजरी), शेखर सुभाष शिंदे (रा. सांगवी, ता. बारामती ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी सूरज शंकर मदने (रा. माळेगाव, बारामती), हरीभाउ बबन खुडे, अशोक गणपती बनसोड (दोघेही रा. मांजरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कुतुबुद्दीन सुभेदार शाह (वय ४०, रा. तांदुळवाडी, बारामती) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाह यांचे बारामती तालुक्यातील लोखंडे वस्ती वंजारवाडी येथे भंगार माल खरेदीचे दुकान आहे. शाह २३ सप्टेंबर रोजी दुकानात होते. त्यावेळीभंडलकर आणि साथीदार हे मोटारीतून तेथे आले. पांढऱ्या रंगाच्या मोटारीवर वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. आरोपींनी शाह यांच्याकडे पोलीस असल्याची बतावणी केली. तू चोरीचा माल खरेदी करतो. ‘१५ लाख रुपये न दिल्यास भिगवण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तुला अटक करतो’,अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली.

हे ही वाचा…कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे

शाह यांनी आरडाओरड केली. तेव्हा एका आरोपीने पिस्तूल काढून त्यांना धमकावले. त्यांना मोटारीत बसवून अपहरण केले. त्यानंतर दौंड -नगर रस्त्यावर चिखली गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर शाह यांना सोडून आरोपी पसार झाले. त्यानंतर त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक समांतर तपास करत हाेते. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा मोटार आराेपी संतोष भंडलकर याची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हे ही वाचा…अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश

भंडलकर आणि साथीदार एका सराफ व्यावसायिकाला लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींना सोलापूर महामार्गावर हिंगणगाव परिसरात सापळा लावून पकडले. अटक करण्यात आलेले आरोपी सराइत असून, त्यांच्याविरुद्ध दहा गु्न्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recently trader selling scrap was robbed at gunpoint in baramatis lokhande vasti area pune print news rbk 25 sud 02