पुणे: शहरात सोमवारी रात्री धुमाकूळ घातलेला पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. शहराच्या आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगामुळे हा पाऊस झाला असून, त्याने शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडवला. पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आणखी एक ते दोन दिवस पावसाची हजेरी असणार आहे.

हेही वाचा >>> पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना ; अग्निशमन दलाकडून पावसात अडकलेल्या १२ जणांची सुखरुप सुटका

water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
Mumbai, Metro Worli, Mumbai, Metro Mumbai,
मुंबई : मार्चपासून मेट्रोची धाव वरळीपर्यंतच
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

हेही वाचा >>> पुणे तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार! पाकलमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; म्हणाले, “पालिकेत भाजपाची सत्ता असूनही…”

पुणे शहर आणि परिसरामध्ये यंदाच्या चार महिन्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. परतीचा पाऊस राज्याच्या विविध भागात धुमाकूळ घालतो आहे. पुणे शहर आणि परिसरामध्येही मोठा पाऊस होतो आहे. सोमवारी रात्री मात्र शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास शहराच्या आकाशात अकरा किलोमीटर उंचीचे प्रचंड मोठे ढग निर्माण झाले. दिवसभर ऊन असल्याने निर्माण झालेली स्थानिक वातावरणीय स्थिती आणि समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प यामुळे मोठे ढग निर्माण झाले. ढगफुटीसाठी अशाच प्रकारचे ढग कारणीभूत ठरतात. पावणेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. काही वेळातच शहरातील रस्ते पाण्याखाली गेले, घरे सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आणि अनेक नागरिक रात्री रस्त्यावर विविध ठिकाणी अडकून पडले. काही ठिकाणी झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या संपूर्ण शहरात रात्रभर पावसाने हाहाकार उडवून दिला. पहाटेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> पुण्यात पावसाचा हाहाकार ; नागरिकांत धडकी

पुण्यात सोमवारी सुमारे दोन ते तीन तासांत अनेक भागात १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. यापूर्वी २०२० मध्ये या केंद्रावर ऑक्टोबरमध्ये एका दिवसात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यापूर्वी २०११ मध्येही १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला होता. पुण्यात मध्यवर्ती भागात २०१० मध्ये ऑक्टोबरमधील आजवरचा सर्वात मोठा पाऊस १८१ मिलिमीटर इतका झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरात एक ऑक्टोबरपासून गेल्या १८ दिवसांत २६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे १ जूनपासून शहरात झालेला पाऊस १००० मिलिमीटरच्या पुढे गेला आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहराच्या पूर्व भागातील पाऊस सर्वाधिक होता. यामध्ये वडगावशेरी भागात १३२ मिलिमीटर, तर मगरपट्टा भागात ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाणमध्ये ९४ मिलिमीटर, कोरेगाव पार्क भागात ९२ मिलिमीटर, लोहगावमध्ये ५४ मिलिमीटर आणि चिंचवडमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्येही पावसाचे प्रमाण मोठे होते. पुरंदरमध्ये १३० मिलिमीटर, तर बारामतीमध्ये १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पमुळे सध्या पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास आणखी काही विलंबाने होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Story img Loader