पुणे : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, तुरीची विक्रमी पेरणी झाली आहे. बुधवारअखेर (१० जुलै) सरासरीच्या ८१.९४ टक्के म्हणजे, ११६.३८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मराठवाडा पेरण्यांमध्ये आघाडीवर आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात बुधवारअखेर ११६.३८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागनिहाय विचार करता, पुणे विभागात सर्वाधिक पेरा झाला आहे. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागात पेरण्या झाल्या आहेत.

कोकण विभागात सरासरीच्या २३.४२ टक्के म्हणजे, ९६८७० हेक्टर, नाशिक विभागात ८०.२९ टक्के म्हणजे, १६,५७,७८८ हेक्टर, पुणे विभागात १०१.७९ टक्के म्हणजे, १०,८४,१६३ हेक्टर, कोल्हापूर विभागात ७४.०३ टक्के म्हणजे, ५,३९,१०३ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९३.०५ टक्के म्हणजे, १९,४४,८२६ हेक्टर, लातूर विभागात ९२.०४ टक्के म्हणजे, २५,४६,६८३ हेक्टर, अमरावती विभागात ८७.३२ टक्के म्हणजे, २७,५८,४४६ हेक्टर आणि नागपूर विभागात ५२.७६ टक्के म्हणजे, १०,१०,१५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

हेही वाचा – पुणे : मद्यपींकडून पोलिसांच्या तिजोरीत कोट्यवधींची भर, दीड महिन्यात १६८४ जणांवर कारवाई; १२ कोटींचा दंड वसूल

मका, कापूस, सोयाबीनसह तेलबिया आणि कडधान्यांच्या पेरण्या वेगाने होत आहेत. मक्याचा पेरा १०१ टक्के म्हणजे, ८,९५,७३७ हेक्टर, तुरीचा पेरा ८१ टक्क्यांवर म्हणजे, १०,५४,४०६ हेक्टर, उडदाचा पेरा ८२ टक्के म्हणजे, ३,०५,०६९ हेक्टर, सोयाबीनचा पेरा, १०८ टक्के म्हणजे, ४४,८७,८४४ हेक्टर आणि कापसाचा पेरा ९० टक्क्यांवर म्हणजे, ३७,६८,२१४ हेक्टरवर झाला आहे. एकूण तृणधान्यांचा पेरा ४७ टक्क्यांवर, एकूण कडधान्यांचा पेरा ७५ टक्क्यांवर, एकूण तेलबियांचा पेरा १०५ टक्क्यांवर गेला आहे.

हेही वाचा – पोलीस दलात दहा ‘आयबाइक’ दाखल, गुन्हा घडताच तातडीने घटनास्थळी जाऊन पुरावे संकलित होणार

राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात १० जुलैअखेर विक्रमी पेरा झाला आहे. ऑगस्टअखेर पेरण्या होतात. त्यामुळे यंदा खरिपातील एकूण पेरा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे, १४२ लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. राज्यभरात खते, बियाणांची चांगली उपलब्धता आहे. – विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार आणि विकास